आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. मात्र या दौऱ्यात आज दुसऱ्यांदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी सामनातून प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील टीकेमुळं महाविकास आघाडीच धोक्यात आल्याचं दिसतंय. सावरकरांवर टीका होत राहिली तर महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असं मत संजय राऊत यांनी सामनातून व्यक्त केलं.
हे ही वाचा : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचं वादग्रस्त विधान, म्हणाले…
भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मिंधे गटाचे वीर सावरकर प्रेम अचानक उफाळून आले. पण त्यांना ही अशी उफाळण्याची संधी राहुल गांधींनी दिली. हा सर्व प्रकार टाळता आला असता तर बरं झाले असते. भारत जोडो यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत असताना सावरकरांच्या कथित माफीची विषय काढून भाजप व मिंधे गटाच्या हाती कोलीत देण्याची गरज नव्हतीच, असं संजय राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
मी एका मिनिटात शिवबंधन सोडणार, पण एकच अट…; महाप्रबोधन यात्रेत सुषमा अंधारेंचं मोठं विधान
“राहुल गांधींविरोधात आंदोलन करणं मनसेला भोवलं; ‘या’ मोठ्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात”
राहुल गांधींच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, म्हणाले…