Home महाराष्ट्र “सुप्रिया सुळेनंतर, आता आदित्य ठाकरे, भारत जोडो यात्रेत आज राहुल गांधींसोबत चालणार”

“सुप्रिया सुळेनंतर, आता आदित्य ठाकरे, भारत जोडो यात्रेत आज राहुल गांधींसोबत चालणार”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात दाखल झाली आहे. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरु आहे. या यात्रेचा 65 वा दिवस आहे.

महाराष्ट्रात नांदेडमधून या यात्रेला सूरूवात झाली असून या यात्रेचा आज 5 वा दिवस आहे. या यात्रेत राजकीय नेत्यांसह वकील, खेळाडू, डाॅक्टर हे सुद्धा सहभागी होत असून या यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेत काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड हे राहुल गांधींसोबत यात्रेत सहभागी झाले होते.

हे ही वाचा : संजय राऊत म्हणाले, शिवसेना बाळासाहेबांची, आता गुलाबराव पाटील म्हणतात…

आता अशातच शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे आज दुपारी हिंगोलीत या यात्रेत सहभागी होणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली होती. काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज दुपारी हिंगोलीत दाखल होणार आहे. यावेळी आदित्य ठाकरे हे राहुल गांधींसोबत चालणार आहेत. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते या यात्रेत सहभागी होणार असून, महाराष्ट्रातील विविध सामाजिक संघटनाही या यात्रेत सहभागी होणार आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

खानाच्या कबरीवरील कारवाईचं संभाजीराजेंकडून स्वागत, म्हणाले…

स्वत:ची तुलना सावरकर-लोकमान्यांशी, मात्र त्यांनी…; मनसेचा संजय राऊतांवर हल्लाबोल

प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफजलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटण्यास सूरूवात; ‘या’ 4 ठिकाणी कलम 144 लागू”