हिंदुत्व सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्ता मिळवली; चंद्रकांत पाटलांची टीका

0
375

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर आज दगडफेक व शाई फेकल्या गेल्याची घटना घडली, तर शिवसेना कार्यकर्त्यांनीच हे केले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांन केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय.

“वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अजून किती अधोगती होणार? हिंदुत्वासह बरंच काही सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्ता मिळवली. आता सुरू झालीये हिटलरशाही. भावना गवळींचा 100 कोटींचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी वाशीमला गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवरचा हल्ला, हा त्याचाच पुरावा!” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे. तसच आपल्या ट्विटसोबत किरीट सोमय्या यांचं देखील ट्विट जोडलं आहे, ज्यांमध्ये गाडीवर शाई फेकली गेलेली दिसत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शरद पवारांच्या भाषणाची सुरुवात ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या’ विचाराने का होत नाही?; राज ठाकरेंचा सवाल

“गोपीचंद पडळकरांनी करून दाखविलं, आता प्रशासनानंही करून दाखविलं, पडळकरांसह 41 जणांवर गुन्हे दाखल”

नितीन गडकरींनी केलं उद्धव ठाकरेंचं कौतुक, म्हणाले तुमच्या नेतृत्वात महाराष्ट्र…

नारायण राणेबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारताच राज ठाकरे म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here