Home महाराष्ट्र …तर अशा माणसानं मुख्यमंत्रीपदी कशाला बसायचं?; सुषमा अंधारेंचा खोचक सवाल

…तर अशा माणसानं मुख्यमंत्रीपदी कशाला बसायचं?; सुषमा अंधारेंचा खोचक सवाल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर ‘टाटा एअरबस’ प्रकल्पही गुजरातला गेला आहे. कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

टाटा एअरबस’ हा महाराष्ट्राबाहेर जाणारा सातवा प्रकल्प आहे. ठरवून महाराष्ट्राचं अर्थकारण खिळखिळं केलं जात आहे. महाराष्ट्रातील युवकांना बेरोजगार करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. मला वाईट याचं वाटतं की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर काहीही ठोस उपाय-योजना करत नाहीत., असं सुषमा अंधारे म्हणाल्या. त्या टी.व्ही.9 मराठीशी बोलत होत्या.

हे ही वाचा : मोठी बातमी! गुजरातमध्ये पुल कोसळल्याने मोठी दुर्घटना; 400 लोक पाण्यात अडकल्याची भिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर सातत्याने नवरात्रीची आरती करणे, गणपतीची आरती करणे, पितृपक्षाचं जेवण करणे, यालाच जर आपल्या कर्तव्याची चौकट मानत असतील, तर अशा माणसाने मुख्यमंत्रीपदी कशाला असावं? सगळेच उद्योग जर तुम्ही गुजरातला देत असाल, तर गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा प्रभारी बनवा. किमान यामुळे तरी ते महाराष्ट्राकडे व्यवस्थित लक्ष देतील, असा टोला सुषमा अंधारेंनी यावेळी मुख्यमंत्र्यांना यावेळी लगावला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

आमदार बच्चू कडूंचं मोठं विधान, म्हणाले, मुख्यमंत्र्यांना भेटण्याआधी…

संकटमोचक मिलिंद नार्वेकर, ठाकरेंची साथ सोडणार?; शिंदे गटातील मंत्र्याच्या विधानाने खळबळ

…तर मी ‘त्या’ शिवसैनिकांना घरात घुसून मारेन; मनसेच्या ‘या’ नेत्याचा इशारा