आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आयोजनातून दरवर्षी शिवाजी पार्कवर दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षीच्या दीपोत्सव कार्यक्रमाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. अशातच खासदार श्रीकांत शिंदे यांनी रविवारी 23 ऑक्टोंबर डोंबिवलीतील मनसे कार्यालयाला भेट दिली आहे.
श्रीकांत शिंदे हे मनसेचे आमदार राजू पाटील यांचे विरोधक मानले जातात. मात्र, त्यांनी डोंबिवली कार्यालयाला भेट दिल्याने युतीच्या चर्चेला उधाण आलं आहे. यावर आता मनसेचे आमदार राजू पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
हे ही वाचा : अजून पंधरा वर्षे राष्ट्रवादी पक्ष सत्तेत येणार नाही; शिंदे गटातील नेत्याचं मोठं वक्तव्य
श्रीकांत शिंदे यांनी आमच्या शहराध्यक्षाच्या विनंतीला मान देत कार्यालयाला भेट दिली. आम्ही राजकारणात विरोधक असलो तरी, दुश्मन नाही आहोत. शिंदे गट आणि भाजपाबरोबर युती करण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष राज ठाकरे घेतीत. स्वतंत्र निवडणूका लढण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत. त्यानुसार आमची तयारी सुरु आहे. मात्र, त्यांनी सांगितलं भविष्यात युती करायची, त्यालाही आम्ही तयार आहोत. आमची सर्वांची मन जुळली आहेत, बाकी सर्वही जुळून येईल, असं राजू पाटील म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
ते मैदानात जिंकले, अन् तुम्ही मात्र…; ठाकरे गटातील खासदाराचा शिंदेंना टोला
अभिनेत्री प्राजक्ता माळी, शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या घरी; मनसेत प्रवेश करणार?; राजकीय चर्चांना उधाण
मनसे-भाजप महायुती होणार की नाही? गुलाबराव पाटील, म्हणाले…