आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड केलं. यानंतर शिवसेनेत मोठी गळती सुरू झाली आहे. अनेक नेत्यांचा शिंदे गटाकडे जाण्याचा कल वाढला आहे. यानंतर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वत: मैदानात उतरले आहेत. अशातच उद्धव ठाकरेंनी आता एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे.
ठाणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर यांनी आज ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या हस्ते घाडीगांवकर यांनी शिवबंधन हाती बांधलं. घाडीगांवकर हे एकनाथ शिंदेंचे कट्टर विरोधक मानले जातात.
हे ही वाचा : राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
2019 च्या विधानसभेत घाडीगावकर हे काँग्रेसकडून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात लढले होते. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. मात्र त्यांना मोठ्या प्रमाणात मते पडली होती. तसेच घाडीगांवकर यांच्यासह यावेळी मंगेश खातू, अशोक कल्लोरी, स्वाती घाडीगांवकर, शुभांगी तावडे, पूजा तांदळे, बाळू पदीर, अमर पवार या नेत्यांनीही शिवसेनेत घरवापसी केली.
महत्त्वाच्या घडामोडी –
“राणेंची मोठी खेळी; कोकणातील पदाधिकाऱ्यांसह, अनेक शिवसैनिकांनी केला भाजपमध्ये प्रवेश”
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; राज ठाकरेंची राज्य सरकारला विनंती
“ठाकरेंचा दणका; शिंदे गटाशी जवळीक साधणाऱ्या ‘या’ माजी नगरसेवकाची पक्षातून हकालपट्टी”