आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, यांनी एक धक्कादायक आरोप केला आहे. माझ्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील असं राजन विचारे यांनी म्हटलं.
मला आणि माझ्या कुटुंबांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास मुख्यमंत्री आणि फडणवीस जबाबदार असतील. माझ्या पोलिस संरक्षणात वाढ करावी, अशी मागणी राजन विचारे यांनी यावेळी केली. या संदर्भात राजन विचारे यांनी पोलिस महासंचालकांना पत्र पाठवलं आहे.
हे ही वाचा : “मनसेनं विजयी खातं उघडलं; ‘या’ ठिकाणी 2 ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला”
महाराष्ट्र शासनाने सूडबुद्धीने माझी सुरक्षा काढली आहे. मी रात्री-अपरात्री माझ्या मतदारसंघांमध्ये फिरत असतो. अशा वेळेस माझ्यावर कुठलाही प्रकारची दुर्घटना घडल्यास किंवा हल्ला झाल्यास अथवा माझ्या कुटुंबियांना काही धोका निर्माण झाल्यास, याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील., असं राजन विचारे यांनी या पत्रात नमुद केलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिंदे गटाला मोठा धक्का; एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यात ठाकरे गटाने मारली बाजी