आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अकोला : शिवसेनेत झालेल्या बंडानंतर ठाकरे आणि शिंदे असे दोन गट निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत ठाकरेंना धक्का दिला. मात्र, राज्याच्या राजकारणात हे चित्र असले तरी देखील अकोल्यातील पंचायत समितीतील निवडणुकीत वेगळे चित्र बघायला मिळाले आहे.
आज अकोला जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती पदाची निवडणूक पार पडली. या निवडणूकीत अकोटमध्ये भाजपने थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. तर, बार्शीटाकळी येथे महाविकास आघाडीला मदत केली आहे.
हे ही वाचा : नागपूरमध्ये फडणवीसांना धक्का; पंचायत समितीत सर्व 13 जागांवर महाविकास आघाडीने मारली बाजी
अकोट आणि बार्शीटाकळी येथे भाजपने महाविकास आघाडीला साथ दिली आहे. अकोटमध्ये भाजपच्या साथीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सभापती झाला आहे. तर भाजपचा उपसभापती झाला आहे.
दरम्यान, बार्शीटाकळीत शिवसेनेच्या बंडखोर सुनंदा मानतकार यांनी भाजपात प्रवेश करीत सभापतीपद मिळवले आहे. इथे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपला मतदान केले आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
आता ऋतुजा लटके यांना राज ठाकरेंनी दिला पाठिंबा; बिनविरोध निवडून देण्यासाठी फडणवीसांना लिहिलं पत्र
एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यानंतर मनसे नेत्याचं ते ट्विट चर्चेत; म्हणाले, मुख्यमंत्री राज ठाकरे…