Home महाराष्ट्र “पुन्हा महाविकास आघाडीची सरशी; ‘या’ निवडणूकीत 5 जागांवर बाजी मारली, तर भाजपच्या...

“पुन्हा महाविकास आघाडीची सरशी; ‘या’ निवडणूकीत 5 जागांवर बाजी मारली, तर भाजपच्या पदरी काय?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील 6 पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीत 6 पैकी 5 पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला तर एका पंचायत समितीवर भाजपचा विजय झाला.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, वाशिम, मंगरुळपीर, आणि मालेगा या 5 पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा विजय झाला. तर मानोरा या एकमेव ग्रामपंचायतीवर भाजपला विजय मिळाला.

हे ही वाचा : … मग कळेल कोन आहे की मशाल; नितेश राणेंच्या ‘मशाल’ चिन्हावरूनच्या टीकेवर ठाकरे गटाचा पलटवार

दरम्यान, कारंजा पंचायत समिती सभापतीपदी, राष्ट्रवादीचे प्रदीप देशमुख यांची बिनविरोध तर उपसभापतीपदी वंचितच्या अलका अंबरकर यांची निवड झाली. रिसोड पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या, केशरबाई हाडे तर उपसभापतीपदी शिंदे गटाच्या सुवर्णा नरवाडे यांची निवड झाली. तसेच वाशिम पंचायत समिती सभापती म्हणून ठाकरे गटाच्या सावित्रीबाई वानखेडे यांची, तर उपसभापती पदी काँग्रेसचे गजानन गोटे यांची नियुक्ती झाली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

युतीबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, म्हणाले, भाजपला उद्धव ठाकरेंप्रमाणे, एकनाथ शिंदेही…

उद्धव ठाकरेंना भाजपाचा धक्का; ‘या’ नेत्यांचा भाजपात प्रवेश

ठाकरेंचा मुलगा नसतो, तर राजकारणात आलो नसतो; अमित ठाकरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण