Home महाराष्ट्र लॉकडाउन सुरू झाल्यापासून राज्यात सायबर गुन्हे वाढले- अनिल देशमुख

लॉकडाउन सुरू झाल्यापासून राज्यात सायबर गुन्हे वाढले- अनिल देशमुख

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यातही लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारीत वाढ झाल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

जेव्हापासून महाराष्ट्रात लॉकडाउनला सुरुवात झाली, तेव्हापासून राज्यातील सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सायबर गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. व्हॉट्स अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम व टिकटॉकचे व्हिडिओ असतील, या सर्वांच्या माध्यामातून भडकाऊ पोस्ट टाकणे, महिलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणे, आक्षेपार्ह व्हिडिओ टाकणे, अफवा पसरवणे, समाजात तेढ निर्माण करणे इत्यादी सर्व चुकीच्या गोष्टी आहेत, असं अनिल देशमुख म्हणाले.

मध्यंतरी टिकटॉकच्या माध्यमातून बलात्कार व अ‍ॅसिड हल्ल्यांसारख्या घटनांना प्रोत्साहन मिळेल, असे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. मी सांगू इच्छितो की, अशाप्रकारचे व्हिडिओ किंवा पोस्ट टाकणे अत्यंत चुकीचे आहे. या सर्वांवर महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाची करडी नजर आहे. आम्ही कुणालाही सोडणार नाही. जो कोणी अशाप्रकारचे व्हिडिओ किंवा पोस्ट टाकेल त्याच्याविरोधात कठोरातली कठोर कारवाई महाराष्ट्र सायबर क्राईम विभागाकडून केली जाईल. असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.

https://www.facebook.com/AnilDeshmukhNCP/posts/3973922905981911

ट्रेंडिंग घडामोडी –

पुणेकरांना दिलासा…पुण्यात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी!

मुख्यमंत्र्याशी चर्चा करायला लाज वाटते का?; शिवसेनेचा विरोधी पक्षाला सवाल

महत्वाच्या घडामोडी –