आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेत शिवसेनेविरोधात बंड केलं. यानंतर शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. त्यानंतर शिंदे गटाकडून पक्षावर आणि पक्षाच्या चिन्हावर दावा सांगितला. यावर आता काश्मीरचे नेते व नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वडिलांसारखं लढण्याचा सल्ला फारुख अब्दुल्ला यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे., असा धीर अब्दुल्ला यांनी ठाकरेंना यावेळी दिला.
हे ही वाचा : एवढी संपत्ती कुठून आली?; छगन भुजबळांनी ठाकरे-पवारांसमोरच दिलं उत्तर, म्हणाले…
अब्दुल्ला यांनी उद्धव ठाकरे यांची विचारपूस केली. तसेच अजिबात घाबरू नकोस. वडिलांसारखं लढ, असं अब्दुल्ला म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, यावर उद्धव ठाकरेंनी, मी ही लढाई अजिबात सोडणार नाही, असं सांगितलं. तसेच शिवसेनेने अशी अनेक वादळे अंगावर घेतली आहे. आपल्याकडे वादळ निर्माण करणारे सोबत आहेत. वादळ असो, पाऊस असो न डगमगता उभे राहणारे आपल्यासोबत आहेत. त्यामुळे कसली भीती नाही, असंही ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर मोठं विधान, म्हणाले…
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ; ठाकरे गटातील ‘या’ मोठ्या नेत्यांवर गुन्हा दाखल
…तो पर्यंत उद्धव आणि शिवसैनिक तुझी मुलं, काळजी घे; खासदार संजय राऊतांचं आईला भावनिक पत्र