आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणुक आयोगाने गोठवले आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला दोघांनाही धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. दोन्ही गटाला ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत मनसैनिकांना शांत राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर माझ्या कोणत्याही महाराष्ट्र सैनिकांनी, कुठल्याही माध्यमांवर अथवा सोशल मीडियावर बोलू किंवा लिहू नये. मी योग्य वेळेस पक्षाची ह्या सगळ्यावर भूमिका मांडेन. , असं राज ठाकरेंनी ट्विटमध्ये म्हटलं. राज ठाकरेंच्या या ट्विटनं अनेक तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.
हे ही वाचा : “निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; ठाकरेंकडून शिवसेनेच्या ‘नव्या’ नावासह, चिन्हाचं पोस्टर जाहीर”
राज ठाकरेंच्या या ट्विटनंतर त्यांना ट्रोल केलं जात आहे. एका युझरनं राज यांच्या सूचनेवर कमेंट केली आहे. एका युजरने, “राजसाहेब दर सहा-आठ महिन्यांनी भूमिका बदलतात, ते पाहता उद्या मूड झालाच तर कदाचित उद्धव यांना पाठिंबा पण देऊन टाकतील. तीच एक भूमिका घेणे बाकी राहिले आहे, अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंच्या ट्विटवर केली आहे. तर दुसऱ्या एका युझरने, शेवटी आज राजसाहेबांना कार्यकर्यांना सांगवच लागलं… स्वतःची तोंड आवरा, शिवसेना वरती टीका करू नका… तुमच्या मुळ उद्धव ठाकरे यांना अजूनच जास्त सहानुभूती मिळतेय., अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एका युझरने, उद्धव साहेब राजसाहेब एकत्र या. यातच मराठी माणसाचे आणि महाराष्ट्राचे भले आहे. हीच योग्य वेळ आहे., अशी कमेंट केली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“कितीही कटकारस्थानं करा, बेईमानीचे घाव घाला, पण शिवसेना संपणार नाही”
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना, शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले, ठाकरेंची शिवसेना ही…
राज्यातील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश, म्हणाले…