आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणुक आयोगाने गोठवले आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला दोघांनाही धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. दोन्ही गटाला ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही.
यानंतर आता निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नावाबाबत मोठा निर्णय दिला. यानंतर ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या नव्या नावासह चिन्हाचे पोस्टर जाहीर करण्यात आलं आहे.
हे ही वाचा : “कितीही कटकारस्थानं करा, बेईमानीचे घाव घाला, पण शिवसेना संपणार नाही”
ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळालं आहे. तर, शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळालं आहे. चिन्हाबाबतही निवडणुक आयोगाने निर्णय दिला आहे. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले आहे. तर, चिन्हासाठी पर्याय सुचवण्याचे आदेश निवडणुक आयोगाने शिंदे गटाला दिले आहेत.
— Uddhav Thackeray (@uddhavthackeray) October 10, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बोलताना, शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले, ठाकरेंची शिवसेना ही…
राज्यातील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश, म्हणाले…
येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून भाजप संपून जाईल; शिवसेनेच्या नेत्याचं मोठं वक्तव्य