आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह निवडणुक आयोगाने गोठवले आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला दोघांनाही धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. दोन्ही गटाला ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
तसेच आगामी अंधेरी पोटनिवडणूकीत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही, त्यामुळे शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : राज्यातील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश, म्हणाले…
गेल्या काही दिवसांपासून ज्या गोष्टीची भीती होती तसेच झाले. एखादी शक्तिशाली संघटना जे ठरवेल, त्या निवडणूक चिन्हावर जिंकेल असं सांगता येत नाही. त्यामुळे चिन्ह असो वा नसो निवडणुकीला जायची तयारी ठेवली पाहिजे., असं मत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केलं.
दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने ठाकरेंची शिवसेना संपणार नाही, असं मोठं विधान शरद पवारांनी यावेळी केलं. तसेच शिवसेना अजिबात संपणार नाही, उलट अधिक जोमाने वाढेल. त्यांची जी तरुण पिढी आहे ती जिद्दीने उठेल आणि आपली शक्ती वाढवेल, असा दावाही शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानं राज ठाकरे दु:खी, पण…; मनसेची प्रतिक्रिया
येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून भाजप संपून जाईल; शिवसेनेच्या नेत्याचं मोठं वक्तव्य