आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
औरंगाबाद : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर शिवसेनेतील नेते आक्रमक झाले आहेत. अशातच आता औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गंभीर एकानाथ शिंदे आणि भाजपावर निशाणा साधलाय.
“देवेंद्रजी, या महाराष्ट्राचं वाटोळं कशासाठी केलं तुम्ही, 5 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले, तुम्ही असं करायला नको होतं” शिवसेनेवर भयंकर संकटं आली आणि त्यातून शिवसेना उभी राहिली, मात्र आता येणाऱ्या काळात महाराष्ट्रातून भाजप संपून जाईल, असं मोठं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.
हे ही वाचा : मनसेत पक्ष प्रवेशाचं वादळ; लातूरमध्ये विवध पक्षातील अनेक कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश
“या गद्दांरांनी खूप मोठं पाप केलं आहे, जे धनुष्यबाणावर निवडून आले, आमदार खासदार झाले, महापौर झाले, नगरसेवक झाले, त्यांचं हृदय शिवसेना फोडून एकनाथ शिंदे यांनी डॅमेज केलं आहे. म्हणून आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की, पुन्हा शिवसेना उभारु, उद्धवसाहेबांच्या नेतृ्त्वात आम्ही जिंकू, असा विश्वासही चंद्रकांत खैरे यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, आनंद दिघेसाहेब असते तर एकनाथ शिंदेंना उलटं टांगलं असतं, असंही चंद्रकांत खैरेंनी यावेळी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मला मारण्याची सूपारी दिली होती, आता शिवसेनेचं प्रत्युत्तर, म्हणाले…
“ठाकरे-शिंदेंना धक्का; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, धनुष्यबाण चिन्ह गोठवलं”
“अजित पवारांचं, मुख्यमंत्री शिंदेंबद्दल मोठं विधान, म्हणाले, …तर या ही बाबाला घरी बसावं लागेल”