आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : यंदाची दिवाळी ही प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. कारण येत्या दिवाळीत 25 ऑक्टोबरला हर हर महादेव हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहासातील अनन्य साधारण व्यक्तिमत्व बाजीप्रभू देशपांडेवर चित्रीत करण्यात आलेला ‘हर हर महादेव’ हा सिनेमा 25 ऑक्टोबरला चित्रपटगृहात येणार आहे. दरम्यान, चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे आणि ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाजात.
हे ही वाचा : “तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही”
राज ठाकरे यांच्या दमदार आवाजातील हर हर महादेव या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. राज ठाकरे यांच्या मनसे अधिकृत या पेजवरून सिनेमाचा टीझर शेअर करण्यात आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची महागाथा अनेक भारतीय भाषांमधून पोहचवणारा झी स्टुडिओचा, अभिजित देशपांडे दिग्दर्शित
“हर हर महादेव” हा चित्रपट २५ ऑक्टोबर २०२२ ला प्रदर्शित होत आहे, त्याची पहिली झलक, राजसाहेबांच्या आवाजातhttps://t.co/A5qblEOWWH@ZeeStudios_— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 5, 2022
दरम्यान, हर हर महादेव या सिनेमाच्या टीझरमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेला अभिनेता सुबोध भावेचा दमदार अभिनय पहायला मिळत आहे. दमदार कलाकार आणि जबरदस्त गाणी असलेल्या आणि राज ठाकरे यांच्या आवाजातील टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. टीझर पाहून प्रेक्षकांची सिनेमाविषयीची उत्सुकता आणखी वाढली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही”
ही तर बाप चोरणारी औलाद; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
आजचा रावण हा पन्नास खोक्यांचा; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा