आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार व बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाकडून अद्याप कोणतीही मोठी जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्या पदरी निराशा आली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी एक यादी जाहीर केली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमध्ये प्रभारी आणि सहप्रभारीची नियुक्ती करण्यात आली आहे. या यादीत विनोद तावडे यांना बिहारचे भाजप प्रभारी तर प्रकाश जावडेकर यांची केरळचे भाजप प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर पंकजा मुंडे मध्यप्रदेश, विजया रहाटकर राजस्थानच्या सहप्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.
हे ही वाचा : पुण्यात गणपती विसर्जनाच्या निमित्ताने आदित्य ठाकरे-चंद्रकांत पाटील एकत्र; चर्चांना उधाण
दरम्यान, या यादीमुळे पंकजा मुंडे यांच्या पदरी पुन्हा निराशा आली असल्याचं पहायला मिळत आहे. पंकजा मुंडेंना भाजपने मध्य प्रदेशच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, त्यांना फक्त सहप्रभारी म्हणून नेमण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेच्या ताकदीत वाढ; नाशिकमधील अनेक मुस्लीम बांधवांनी हाती बांधलं शिवबंधन”
मुंबई महापालिका निवडणूकीत मनसेला सोबत घेण्याची गरज नाही; रामदास आठवलेंचा भाजपला सल्ला
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेनेचा ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर?