आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्रामध्ये झालेल्या सत्ताबदलानंतर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात पहिली लढत होणार आहे. यासाठीचं उद्धव ठाकरे हे तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मोठी घोषणा केली आहे.
अंधेरी पूर्वच्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी उमेदवाराची घोषणा केली आहे. अंधेरी पूर्वमधून शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन झालं होतं, त्यामुळे या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, ऋतुजा रमेश लटके यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळं अंधेरी पूर्वची ही पोटनिवडणूक कधी होणार हे पाहणं आता उत्सुकतेचं असणार आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
…अन् राज ठाकरेंनी चाहत्यांची सेल्फीची इच्छा केली पूर्ण
“शिंदे गटाचा शिवसेनेला पुन्हा दणका; ‘या’ आक्रमक महिला नेत्या करणार शिंदे गटात प्रवेश?”