आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची माहिती उघड झाली आहे. हे दोन्ही नेते भाजपच्या एका प्रवक्त्याच्या घरी भेटले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड चर्चाही झाल्याचं सांगितलं जातं आहे.
अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची आधीही चर्चा होती. त्यानंतर आता हे दोन्ही नेते एकमेकांना भेटल्याने या चर्चांना अधिक उधाण आलं आहे.
हे ही वाचा : अमित शाह घेणार राज ठाकरेंची भेट?; भाजप-मनसे युतीची चिन्हे
अशोक चव्हाण हे भाजपचे प्रवक्ते आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते. तिथेच काल सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आले होते. दोन्ही नेते एकाचवेळी कुलकर्णी यांच्या घरी पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
दरम्यान, काँग्रेसचे काही आमदार आणि माजी मंत्री भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा जोरदार चर्चा आहे. अशातच अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांना भेटले. त्यामुळे काँग्रेसला खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
बापू, महाराष्ट्रात करमणूक बंद करा, 50 खोक्यातून आधी बायकोला साडी घेऊन द्या; शिवसेनेचा टोला
येत्या 15 दिवसात भूमिका स्पष्ट करा अन्यथा…; मराठा क्रांती मोर्चाचा, शिंदे सरकारला इशारा