आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
हिंगोली : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. यानंतर शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मैदानात उतरले आहेत. अशातच उद्धव ठाकरेंनी मोठा डाव टाकला आहे. हिंगोलीतील वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसचा हा मोठा नेता आता शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
हे ही वाचा : शिवतीर्थावर शिवसेनेचा म्हणजे आमचा दसरा मेळावा होणार- उद्धव ठकरे
शिवसेनेमध्ये बंडखोरी केल्यानंतर कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाले. अशातच विधानसभा निवडणुकीत आमदार संतोष बांगर यांचे प्रतिस्पर्धी राहिलेले वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर आणि काँग्रेसचे कळमनुरीचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे हे शिवबंधन हाती बांधणार आहेत.
दरम्यान, यामुळे शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांना कडवं आवाहन मिळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
रोहिणी खडसे आल्या, तसंच तुम्हीही राष्ट्रवादीत या; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची पंकजा मुंडेंना ऑफर
ईडीच्या चाैकशीबाबत रोहित पवारांचा मोठा खुलासा, म्हणाले…