आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून राज्यामध्ये सरकार स्थापन केलं, यानंतर राज्यात शिंदे गटाविरूद्ध ठाकरे गट झाला आहे. यानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाचा दसरा मेळावा कोणाचा होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच आता शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य केलं आहे.
शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच उचलून खिशात टाकायला शिवसेना रस्त्यात पडलेली नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.
हे ही वाचा : मोहित कंबोज यांच्या आरोपानंतर रोहित पवार मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला, देवेंद्र फडणवीसही हजर; चर्चांना उधाण
दसरा मेळावा शिवसेनेचा म्हणजे आमचाचं होणार आहे. आमच्या मनात संभ्रम वगैरे काही सुध्दा नाही. संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी करु द्या. शिवसैनिकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दसऱ्याला शिवतीर्थावर येण्याची तयारी सुरु केली आहे. मला बाकीच्या तांत्रिक गोष्टी अजिबात माहिती नाहीत, परंतु दसऱ्याला शिवसेना मेळावा उत्साहात साजरा होणार आहे एव्हढं मात्र नक्की असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
रोहिणी खडसे आल्या, तसंच तुम्हीही राष्ट्रवादीत या; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची पंकजा मुंडेंना ऑफर
ईडीच्या चाैकशीबाबत रोहित पवारांचा मोठा खुलासा, म्हणाले…
महाविकास आघाडीच्या वाईन विक्रीच्या धोरणाबाबत शरद पवारांंचं मोठं विधान, म्हणाले…