आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विटरवरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना लक्ष केले होते. यानंतर रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवारांनी माध्यमांशी संवाद साधत या भेटीबाबतची माहिती दिली. विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या हिताचा एक निर्णय मांडला होता. युरोपमध्ये जगदंबाची तलवार आहे, अनेक अशा वस्तू बाहेर आहेत. त्या भारतात कशा आणाव्यात, याबद्दल आम्ही चर्चा केली. तसंच पोलिसांच्या सुट्टीबद्दल आम्ही चर्चा केली, अशी माहितीही रोहित पवारांनी यावेळी माध्यमांशी बोलताना दिली.
हे ही वाचा : रोहिणी खडसे आल्या, तसंच तुम्हीही राष्ट्रवादीत या; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची पंकजा मुंडेंना ऑफर
दरम्यान, रोहित पवार यांच्या ग्रीन एकर्स कंपनीच्या माध्यमातून झालेले व्यवहार आणि बॅंकांची फसवणूक हे समोर आणण्याचा प्रयत्न कंबोज यांनी केला होता. तसेच ‘बारामती अॅग्रो’ कंपनीचा आपण अभ्यास करत असून लवकरच सविस्तर अहवाल सादर करू, असा इशाराही कंबोज यांनी दिला होता. यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमधील राजकीय वातावरण तापलं होतं.
महत्त्वाच्या घडामोडी –
ईडीच्या चाैकशीबाबत रोहित पवारांचा मोठा खुलासा, म्हणाले…
महाविकास आघाडीच्या वाईन विक्रीच्या धोरणाबाबत शरद पवारांंचं मोठं विधान, म्हणाले…
शिवसेना म्हणजे अंगार, आगीशी कोण खेळणार असेल तर…; भास्कर जाधवांचा इशारा