आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
अकोला : राष्ट्रवादीचे माजी आमदार भय्यासाहेब तिडके यांचा अमृतमहोत्सव सोहळा अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये येथे आज पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. आश्चर्याची बाब म्हणजे या सोहळ्याच्या मंचावर जयंत पाटील यांच्यासोबत भाजपच्या दोन आमदारांनी उपस्थिती लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
भाजप आमदार हरीश पिंपळे आणि प्रकाश भारसाखळे या दोन आमदारांनी राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तसेच या कार्यक्रमाची सांगताही भाजपच्या या आमदारांनी राष्ट्रगीत म्हणून केली. त्यामुळे अनेकाच्या राजकीय भुवय्या उंचावल्या आहेत.
हे ही वाचा : काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र सूरूच; गुलाम नबी आझादनंतर आता ‘या’ मोठ्या नेत्यानं दिला राजीनामा
दरम्यान, यानंतर जयंत पाटील, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे हे प्रमुख नेते एकत्र आले. त्यानंतर भाजप आमदार पिंपळे आणि भारसाखळे यांनी राष्ट्रवादीच्या या नेत्यांसोबत जेवणाचा आस्वाद घेतला. यानंतर त्यांच्यात अनेक चर्चा रंगल्या. त्यामुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“कोल्हापूरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”
आनंद दिघे यांना टाडा लागला तरी, ते कोणाच्या पायाशी गेले नाहीत; शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल