Home महाराष्ट्र लोकांमध्ये जाण्याची जी माझी सवय होती त्याचे परिणाम मला भोगावे लागले- जितेंद्र...

लोकांमध्ये जाण्याची जी माझी सवय होती त्याचे परिणाम मला भोगावे लागले- जितेंद्र आव्हाड

मुंबई : करोनावर मात केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रीया दिली आहे . 10 तारखेला डॉक्टरांनी मला रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं सांगितलं होतं. पण अतिशहाणपणा करण्याचा माझा स्वभाव आहे. त्याला आता मुरड घालावी लागेल. लोकांमध्ये जाण्याची जी सवय होती त्याचे परिणाम भोगावे लागले,  अशी खंत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

अतिशहाणपणा केल्यानेच मला करोना झाला. लोकांनी मला मास्क घाला सांगितलं होतं. गर्दीत गेल्यावरच मी अनेकदा मास्क वर नाकावर सरकवून घ्यायचो. हे नियम समाजाने पाळायला हवेत. नियम पाळले असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. एक अद्दल घडवण्यासाठीच कदाचित हे सगळं घडलं असं माझं मत आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

दरम्यान, मला करोना झाला आहे हे माहितीच नव्हतं. आयसीयूत असताना जेवणासाठी जे ताट यायचं त्यावर करोना रुग्ण लिहिलेलं पाहून मला करोना झाला असल्याचं कळालं, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

हे सरकार आघाडीचं आहे की वाधवान सरकार?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

…अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत ; हरभजन सिंगचा शाहिद आफ्रिदीला इशारा

लॉकडाउन 4 साठी केंद्राची नियमावली जाहीर; काय सुरु, काय बंद राहणार ?

“साईंचं सोनं देशाच्या उपयोगी येत असेल तर भक्तांना आनंद होईल”