आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. यामुळे आता राजकारणात आता नवीन काय घडामोडी घडतार, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. अशातच पावसाळी अधिवेशन सुरू असताना मुंबईत आज महाविकास आघाडीच्या घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.
आम्ही महाविकास आघाडी म्हणून अजूनही एकत्र आहोत, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. तसेच उद्धव ठाकरेंनी यावेळी, आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीवरही भाष्य केले. या निवडणुका एकत्र लढायच्या की स्वतंत्र याबाबतचा निर्णय झाला की कळवला जाईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : जिथं सत्ता नव्हती, तिथं आणली गेली; शरद पवारांचं भाजपवर टीकास्त्र
महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आहात. मग येणाऱ्या पालिका निवडणुका तुम्ही एकत्र लढवणार का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर ठाकरेंनी, बऱ्याच दिवसांनी आम्ही एकत्र भेटलो आहोत. एकत्र भेटल्यानंतर जरा बरं वाटलं आहे. आम्ही कुठेही फुटलेलो नसून एकत्र आहोत. त्यामुळे पुढे काय करायचं याबाबत जेव्हा निर्णय होईल तेव्हा तुम्हाला निश्चित सांगू, असं उत्तर दिलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
तुम्ही शिवसेनेतून कसे बाहेर पडलात?; राज ठाकरेंनी केला मोठा खुलासा, म्हणाले…
मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानभवनात झाले दाखल
शिवसेनेकडून हकालपट्टीचं सत्र सूरूच; आता आणखी 2 बंडखोर आमदारांची ठाकरेंकडून हकालपट्टी