आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. अजूनही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. याच पार्श्वभूमीवर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या भावना जाणून घेत आहेत. यावरून आता शिंदे गटातील बंडखोर आमदार शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तुम्ही मंत्री असताना महाराष्ट्रात किती फिरत होता?, असा सवाल शंभूराज देसाई यांनी यावेळी केला. आज तुमचं सरकार गेलं म्हणून तुम्ही राज्यात दौरे करत आहात. मंत्री असताना तुम्ही किती दौरे केले त्याकडे पहिलं लक्ष द्या, असंही शंभूराज देसाई म्हणाले.
हे ही वाचा : केसरकर, आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी, नोकरी पाहिजे असेल तर अर्ज करा; निलेश राणेंचा हल्लाबोल
सत्ता गेली. निष्ठावंत शिवसैनिक आणि शिवसेनेचे 40 आमदार हे शिंदेंच्या नेतृत्वात एकवटले आहेत. हे पाहिल्यावर तुम्ही राज्यात फिरत आहात. हे चांगलं लक्षण आहे. या निमित्ताने तुमचं दर्शन होतंय. सामान्य माणसांना भेटत आहात. या निमित्ताने मातोश्रीची दारे सामान्य माणसाला उघडी झाली. त्यामुळे यावर आम्हाला काही म्हणायचे नाही. , अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी यावेळी केली.
महत्त्वाच्या घडामोडी –
संजय राऊत यांच्यानंतर काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या अडचणीत वाढ
“सत्तांतर झाल्यापासून अजित पवारांना राजकारण कमी, भविष्यवाणी अधिक कळू लागलीये”