Home महाराष्ट्र “बंडखोरीमुळे शिवसेनेच्या ताकदीत वाढ; लोहारा-उमरगा तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला”

“बंडखोरीमुळे शिवसेनेच्या ताकदीत वाढ; लोहारा-उमरगा तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

धाराशिव : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार पडलं. आमदारांनतर शिवसेनेचे खासदारही शिंदे गटात दाखल झाले आहे. मात्र याचा फायदा आता शिवसेनेला मिळाला आहे.

हे ही वाचा : सांगलीतील एकमेव ग्रामपंचायतीवर रोहित आर. आर. पाटलांनी विजयी गुलाल उधळला; भाजप खासदाराचं डिपाॅझिट जप्त

राज्यातील विविध ठिकाण्यातील ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर होत आहेत. यात धाराशिव जिल्ह्याचे युवानेते मा.किरण भैय्या गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.श्री.कैलास दादा पाटील याच्या मार्गदर्शनाने उमरगा-लोहारा तालुक्यात सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक 2022 पार पडली. या निवडणुकीत उमरगा -लोहारा तालुक्यातील ग्रामपंचायतीवर शिवसेनेनं आपला विजयी झेंडा फडकवला आहे.

दरम्यान, उमरगा तालुक्यातील,  कसगी ग्रामपंचायत पैकी 12, तुगाव 13 पैकी 11, कोरेगाववाडी 8 पैकी 5 तर लोहारा तालुक्यातील, खेड ग्रामपंचायतीत 11 पैकी 6 जागांवर शिवसेनेनं बाजी मारली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“धाराशिवमध्येही शिवसेनेचा भगवा फडकला; 13 पैकी 12 जागांवर मारली बाजी”

उद्धव ठाकरे 15 दिवसात राजीनामा देणार होते, मात्र…; शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकरांचा मोठा गाैफ्यस्फोट

“शिवसेनेनं खातं उघडलं; ‘या’ निवडणूकीत सर्व 7 जागांवर मारली बाजी”