Home महाराष्ट्र “शरद पवारांनी नाही, तर फडणवीसांनी कटकारस्थान रचलं, आणि एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली”

“शरद पवारांनी नाही, तर फडणवीसांनी कटकारस्थान रचलं, आणि एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष 10 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. आणि त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीला जबाबदार कोण, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

शिंदे गटातील आमदारांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना टार्गेट केलं. जेंव्हा जेंव्हा शिवसेना फुटली तेंव्हा तेंव्हा त्यामागे शरद पवार असल्याचा गंभीर आरोप शिंदे गटातील आमदारांनी केला होता. यावरून आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : मोठी बातमी; संजय राऊतांच्या घरी ईडीची धाड

शिवसेना ही शरद पवारांनी फोडली नाही तर देवेंद्र फडणवीसांनी कटकारस्थान रचले आणि एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली, असा गाैफ्यस्फोट विद्या चव्हाण यांनी यावेळी केला. महाराष्ट्र सदनात काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

आमदार सुरतला पळून गेले. जर बारामतीला आले असते तर आम्ही म्हटले असते, की शरद पवारांनी शिवसेना फोडली, असा टोलाही विद्या चव्हाण यांनी यावेळी लगावला. शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांच्यावर आरोप करून मोकळे व्हायचे, असा त्यांचा कार्यक्रम आहे. शरद पवारांवर टीका केली, की प्रसिद्धीही मिळते. बंडखोर आमदार एकीकडे भाजपाशासित गुजरात राज्यातील सुरतमध्ये जातात आणि दुसरीकडे शरद पवारांनी शिवसेना फोडली म्हणतात, असं म्हणत विद्या चव्हाण यांनी शिंदे सरकार व भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

‘राज्यपालांच्या वक्तव्याशी मी…’; देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

उद्धव ठाकरेंना मोठा झटका; बाळासाहेबांचे ‘हे’ नातू शिंदे गटात सामील

“या म्हाताऱ्या राज्यपालांची उचलबांगडी करा”