आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 व अपक्ष 10 आमदारांना सोबत घेऊन बंड केलं. शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यादेखील शिंदे गटात सामील झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. मात्र आता भावना गवळी यांचे घटस्फोटीत पती प्रशांत सुर्वे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
खासदार भावना गवळी व प्रशांत सुर्वे यांचा 2013 साली घटस्फोट झाला आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुर्वे यांनी शिवबंधन हाती बांधलं.
हे ही वाचा : “मोठी बातमी! शिंदे गटातील ‘या’ आमदाराची बहीण उद्धव ठाकरेंसोबत; दिले ‘हे’ मोठे संकेत”
प्रशांत सुर्वे हे व्यवसायाने वैमानिक असून त्यांनी अनेक वर्षे एअर इंडिया आणि इंडियो विमान कंपनीत वैमानिक म्हणून काम केलं आहे. 2014 साली त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली होती.
महत्त्वाच्या घडामोडी –
संभाजीनगर नामकरण वाद हायकोर्टात; ‘या’ दिवशी होणार सुनावणी
भाजपचे अनेक निष्ठावंत आमच्या संपर्कात; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
नारायण राणे भाजपाने टाकलेल्या तुकड्यावर जगतात ; शिवसेनेची टीका