मुंबई : औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराचा वाद हायकोर्टात गेला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे.
हे ही वाचा : भाजपचे अनेक निष्ठावंत आमच्या संपर्कात; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
1 ऑगस्ट रोजी या याचिकेवरक सुनावणी होणार असून औरंगाबादचे रहिवासी असलेले मोहम्मद मुश्ताक अहमद, अण्णासाहेब खंदारे व राजेश मोरे यांनी ही जनहित याचिका केली आहे. याचिककर्त्यांच्या वकिलांनी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर बुधवारी प्राथमिक माहिती सादर केली.
औरंगाबादसह उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या बैठकीत घेतला होता. त्यानंतर शिंदे सरकारने रद्द केला आणि चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, 16 जुलै रोजी झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत शहराच्या नामांतराचा निर्णय पुन्हा घेण्यात आला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
नारायण राणे भाजपाने टाकलेल्या तुकड्यावर जगतात ; शिवसेनेची टीका
उद्धव ठाकरे आजही शिवसेनापक्षप्रमुख, यापुढेही कायम राहतील; शिंदे गटातील ‘या’ खासदाराचं विधान