आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे शिवसेनेत गळती सूरू झाली आहे. अशातच आता शिवसेनेसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.
इंदापूरच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून शिवसेना पदाधिकाऱ्याचे नाव विशाल बोंन्द्रे असं आहे. ते पुणे जिल्ह्याचे समन्वयक आहे.
हे ही वाचा : शिंदे गटात यायला नकार दिल्यानं शिवसैनिकाला जोरदार मारहाण; सांगलीतील शिवसेना नगरसेविकाचा आरोप
महिलेच्या खांद्यावर हात ठेवल्याने त्यांच्यावर विनयभगांचा गुन्हा दाखल झाला आहे. इंदापूर पोलिसांनी त्यांच्या विरोधात विनयभगांचा गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान, 14 जुलैला संध्याकाळी शिवसेना पदाधिकाऱ्यांची इंदापूर येथे बैठक पार पडली. ही बैठक संपल्यावर सगळेजण ग्रुप फोटो काढण्यासाठी उभे होते. फोटो काढण्यासाठी उभे राहिले असता विशाल बोंन्द्रे पिडीत महिलेच्या पाठीमागे उभे राहिले होते. उभे राहिल्यानंतर त्यांनी त्या महिलेच्या खांद्यावर हात ठेवला. यावरून त्या महिलेने त्यांच्यावर विनयभगांचा गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“एकनाथ शिंदेंचा आता शिवसेनेनंतर काँग्रेसलाही धक्का; ‘हा’ नेता आता शिंदे गटात सामील”
“अब राजा का बेटा राजा नही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा”