Home महाराष्ट्र “सत्तेसाठी ‘बाळासाहेबांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट काढून टाकलं, अन्…”

“सत्तेसाठी ‘बाळासाहेबांच्या नावापुढे हिंदूहृदयसम्राट काढून टाकलं, अन्…”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ‘झी 24 तास’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली.

‘राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर यांनी बाळासाहेबांच्या नावापुढचं हिंदूहृदयसम्राट काढून टाकलं. एका होर्डिंगवरती उर्दूमधील एका होर्डिंगवर बाळासाहेबांच्या अगोदर काय लावलं जनाब? म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही सोडून द्यायच्या फक्त सत्तेसाठी आणि पैशांसाठी आणि उद्या हातातलं गेलं की तुम्ही बाळासाहेबांच्या नावाने जप करत बसायचा. मराठी माणसाने फक्त एवढंच बघत बसायचं का?,असा सवाल करत ‘हे ढोंगी आहेत. हे फक्त बाळासाहेबांच्या नावाचा वापर करत आहेत आणि वापर करून जेवढं पदरात अजून घेता येईल तेवढं चालू आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : शिवसेना-राष्ट्रवादीचं आधीच ठरलं होतं, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

दरम्यान, शिवसेनेमध्ये फुट बघायला मिळतात आहे, अशा परिस्थितीत जर बाळासाहेब असते तर अशी परिस्थिती ओढवाली असती का? यावर राज ठाकरे म्हणाले, शक्यच नाही, याच कारण ते तुम्ही शिवसेना एक पक्ष किंवा संस्था म्हणून बघू नका, ती एका विचाराने बांधली गेलेली माणसे होती. बाळासाहेब होते तोपर्यंत तो विचार होता. त्या विचारासोबत बांधली गेलेली माणसे होती. त्यामुळे बाळासाहेब असते तर हे शक्यच नव्हते, असं राज ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही; राज ठाकरेंचा हल्लाबोल

“सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

शिवसेना कुणाची? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले…