मुंबई : दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित न करता महाराष्ट्राची राजभाषा मराठीतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज ठाकरे यांनी केली आहे.
राज ठाकरे यांनी याबाबतचे पत्र त्यांनी दूरदर्शनला पाठवले आहे. राज ठाकरेंचे हे पत्र पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संजय चित्रे यांनी आज दूरदर्शनचे अप्पर महासंचालक नीरज अग्रवाल यांना दिले.
हे ही वाचा : दिव्यांग कबड्डीपटूच्या घरी मनसे नेते अमित ठाकरे पंगतीत बसून जेवले; व्हिडिओ व्हायरल
दरम्यान, अग्रवाल यांची प्रसारण भवन येथे भेट घेऊन त्यांना पत्र देण्यात आले. यावेळी या विषयासंदर्भात सविस्तर चर्चाही त्यांच्यासोबत करण्यात आली. सध्या मराठीसह इतर भाषेतील कार्यक्रमही प्रसारित होत असल्याचे लक्षात आले आहे. त्याबाबतच्या तक्रारीही सर्वसामान्य करत असल्याचे मनसेने म्हटलं आहे.
दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर हिंदी भाषेतील कार्यक्रम प्रसारित न करता महाराष्ट्राची राजभाषा- मराठीतील कार्यक्रमच प्रसारित करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. pic.twitter.com/wpoRLhXuIs
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) July 20, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! शिवसेनेच्या कल्याण उपशहर प्रमुखावर जीवघेणा हल्ला
शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद देतो, 100 कोटी रूपये द्या; चक्क आमदाराकडेच मागणी, चाैघांना अटक
कितीही बाण पळवले तरी धनुष्य माझ्याकडेच; उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा