Home महाराष्ट्र “जे जे आनंदाने मिळालं, ते आनंदाने भोगलं ना, मग टीव्हीसमोर रडण्याचं ढोंगसोंग...

“जे जे आनंदाने मिळालं, ते आनंदाने भोगलं ना, मग टीव्हीसमोर रडण्याचं ढोंगसोंग कशाला?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा काल राजीनामा दिला. यानंतर त्यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना आपल्या मनातील भावना बोलून दाखवली. यावेळी बोलताना त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत होते.

‘शिवसेनेत आम्ही 52 वर्ष घालवली. तुम्ही भीक दिली असं कसं म्हणू शकतात. आम्ही शिवसेनेसाठी सर्वकाही केलं. उद्धवजी का तुम्ही शरद पवार, सोनिया गांधी यांना सोडत नाहीत’, असं रामदास कदम म्हणाले. यावरून आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीला धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश” 

जे जे आनंदाने मिळालं, ते आनंदाने भोगलं ना, मग टीव्हीसमोर रडण्याचं ढोंगसोंग कशाला?, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी रामदास आठवलेंना जोरदार फटकारलं. जिल्हाप्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते.

दरम्यान, तसं पाहिलं तर आमदार आणि खासदारांना मी सूद्धा डांबून ठेवू शकलो असतो. त्याला लोकशाही नाही म्हणत. तुम्ही मनाने गेला असाल तर मी किती दिवस तुम्हांला कोंडू शकतो. त्या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये. मी आजही कार्यकर्त्यांना भेटलो. त्यांनाही सांगितलं ज्यांना जायचंय , त्यांनी जरूर जा, उगाच नाटकं करू नका, जे जे आनंदाने मिळालं, ते आनंदाने भोगलं ना, मग टीव्हीसमोर रडण्याचं ढोंगसोंग कशाला?, असा टोला उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“राष्ट्रवादीला धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश”

ठाकरेंपाठोपाठ आता महादेव जानकरांनाही मोठा धक्का, पदाधिकाऱ्यांनी सांगितला पक्षावरच हक्क

शिवसेनेचे 12 नव्हे तर आमच्यासोबत एकूण…; दिल्लीत पोहचल्यानंतर एकनाथ शिंदेंंचा मोठा गाैफ्यस्फोट