आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांच्या बंडखोरीनंतर आता शिवसेनेचे 12 खासदारदेखील बंडखोरी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हे 12 खासदार उद्या शिंदे गटात सामील होणार आहेत, असा दावा केला जातोय. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार बंडखोरी करण्याचा प्रयत्न करत असतील, तर शिवसेनेतर्फे कायदेशीर आव्हान दिले जाईल, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. ते दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत गोते.
हे ही वाचा : “राष्ट्रवादीत इनकमिंग सूरूच; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”
विधिमंडळात बंडखोरी झाली. त्याला कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. जर लोकसभेमध्ये कोणी असा प्रकार करणार असेल, तर त्याला कायदेशीर आव्हान दिले जाईल. कोणी असा प्रयत्न करत असेल, तर त्यांना फुटीरच म्हणावे लागले. लोकसभेतील शिवसेना ही या क्षणी एकसंध आहे, असे आम्ही मानतो, असंही राऊत म्हणाले.
महत्त्वाच्या घडामोडी –
“उद्धव ठाकरेंनी गोड बोलून, मनसेचा गळा कापण्याचा प्रयत्न केला”
“बाळासाहेब ठाकरे हा ब्रॅण्ड आहे, अन् उद्धवजी हा ब्रॅण्ड घेऊन राजकीय वाटचाल करत आहेत”
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला नाही; फडणवीसांना फोन केल्याच्या बातमीचं शिवसेनेकडून खंडण