मुंबई : भाजपानं विधान परिषद निवडणुकीसाठी उमेवारांची घोषणा केल्यानंतर एकनाथ खडसे यांची नाराज दडून राहिली नाही. उमेदवारांच्या नावांची घोषणा झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका मांडली होती. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं होतं. त्यावर एकनाथ खडसेंनी पलटवार केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थी परिषदेचं इतकं काम केल, तर त्यांनी मेधा कुलकर्णीचं आमदारकीचं तिकीट कापून स्वतः उभं राहायला नको होतं. त्यांनी स्वार्थासाठी मेधा कुलकर्णींचा बळी दिला. तुम्ही जर एवढे मोठे नेते आहात, तर तुम्ही कुठूनही निवडून यायला हवं. कोल्हापूरमधून त्यांनी का नाही निवडणूक लढवली?,” असा सवाल करत एकनाथ खडसे यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.
दरम्यान, मी मार्गदर्शकाच्या भूमिकेत होतो आणि यापुढेही कायम राहिल. चंद्रकांत पाटील हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष झाले, तेव्हा त्यांचा पक्षाशी संबंध आला. गेली 40 वर्षे चंद्रकांत पाटील यांचा भाजपाशी संबंध नव्हता. संघाच्या माध्यमातून ते विद्यार्थी परिषदेचं काम करत होते. भाजपाचे जुने नवे कार्यकर्ते त्यांना माहिती नव्हते. ज्या काळात भाजपाच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होत होतं, त्या काळात आम्ही निवडून येत होते, असंही एकनाथ खडसे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“नरेंद्र मोदींनी जाहीर केलेलं पॅकेज फक्त रोजगार वाचवणारे नाही तर वाढवणारे”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊन शिथील करण्याची हिम्मत दाखवावी- देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस सज्जन माणूस, त्यांनी छाती फाडून दाखवायची का?, चंद्रकांत पाटलांचा खडसेंना सवाल
आर्थिक पॅकेजची घोषणा भविष्यात पोकळ ठरू नये- बाळासाहेब थोरात