Home महाराष्ट्र औरंगाबादचं संभाजीनगर होणारच, नामांतराला स्थगिती नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट

औरंगाबादचं संभाजीनगर होणारच, नामांतराला स्थगिती नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असं नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली आहे. या निर्णयानंतर विरोधकांकडून शिंदे सरकारवर जोरदार टीका होत आहे. यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर असं होणारच, नामांतराला स्थगिती दिली जाणार नाही, असं फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं. ते पत्रकारांशी बोलत होते.

हे ही वाचा : मी राज ठाकरेंना भेटायला गेलो तर कोणाला मळमळायचं कारण काय?; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

दरम्यान, औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव किंवा नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देणं या मागण्यांना मागील सरकारने अडीच वर्षांत हात लावला नाही. मात्र बहुमत गमावल्यानंतर बैठक बोलावून निर्णय घेतले. हे संकेतांना धरून नाही, असंही फडणवीस म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

राज ठाकरेंनी शिवसेना ‘सोडली’, पण…; राष्ट्रवादी नेत्याची टीका

महापालिका निवडणूकीत महाविकास आघाडी होणार?; शरद पवारांचं सूचक विधान, म्हणाले…

मीरा-भाईंदरमधील ‘ते’ 11 नगरसेवक आजही उद्धव ठाकरेंसोबत; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा