मुंबई : विधान परिषदेच तिकिट नाकारल्यामुळे एकनाथ खडसे यांच्याकडून होत असलेल्या आरोपांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस एक सज्जन माणूस आहे. ते सहन करतात म्हणून त्यांच्याबद्दल काहीही म्हणायचं, त्यांनी आता छाती फाडून दाखवायची का?” असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. ते एका वृत्तवाहिनीवर बोलत होते.
मी आणि देवेंद्र फडणवीस दोघांनी एकनाथ खडसे, बावनकुळे व पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचं तिकिट मिळावं यासाठी प्रयत्न केले होते. चार-पाच मे रोजी जेव्हा नाथाभाऊंना तिकिट मिळणार नाही याची कल्पना आली तेव्हा पर्यायी उमेदवार तयार ठेवायला नका का? उमेदवारीचा फॉर्म भरता आला नसता, नाचक्की झाली असती. म्हणून अन्य उमेदवारांना मुंबईत आणलं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, मार्चमध्येच विधान परिषदेचे उमेदवार ठरले होते तसेच खडसे यांच्याबद्दल केंद्राला योग्य माहिती दिली गेली नाही. हे दोन्ही आरोप चुकीचे आहेत, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
आर्थिक पॅकेजची घोषणा भविष्यात पोकळ ठरू नये- बाळासाहेब थोरात
…तर 105 आमदारांचे 50 व्हायला वेळ लागणार नाही- एकनाथ खडसे
लोकशाही पद्धत आता भाजपात राहिलेली नाही- एकनाथ खडसे
आपल्याला नियमांचं पालन करुन या युद्धाचा सामना करायचा आहे- नरेंद्र मोदी