आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.
यानंतर आता शिवसेनेत उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. तसेच शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंनी या बंडखोरांना परत येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र यात यश न आल्यानं शिवसेनेनं आता एक मोठा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा : शिवसेनेला पुन्हा हादरा! ‘हा’ नेता एकनाथ शिंदे गटात सामील
शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांची हिंगोलीच्या जिल्हा प्रमुखपदावरुन तर तानाजी सावंत यांची सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. तशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
मनसेला मंत्रीमंडळात घेण्यास आमचा विरोध, आरपीआयला मंत्रीमंडळात स्थान हवं- रामदास आठवले
गिरीश महाजन हे बालिश, आजपर्यंत माझी पादत्राणे घेऊन ते मत मागत होते; एकनाथ खडसेंचं जोरदार प्रत्युत्तर
आषाढी एकादशीला माणसातल्या “विठ्ठला”चे दर्शन झाले; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने केली भावना व्यक्त