आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.
आज आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा करण्यात आली. यानंतर एकनाथ शिंदेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं.
हे ही वाचा : “एकनाथ खडसेंची अवस्था म्हणजे, मंदिरात गेले तर प्रसाद संपला, बाहेर आले तर चप्पल चोरीला”
आपण लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत, असं शिंदे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना सांगितलं. बंड झाल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. त्यामुळे या भेटीत नेमकं काय होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
शिंदे गटातील प्रवक्ते व आमदारांची उद्धव साहेबांशी चर्चा करण्याची विनंती; दीपाली सय्यद यांचं ट्विट
शिवसेनेचा मोठा निर्णय; ‘या’ नेत्यांची केली पक्षातून हकालपट्टी
शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही; नारायण राणेंची भविष्यवाणी