Home महाराष्ट्र “फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारल्यासारखं वाटत नाही, त्यांचा चेहरा तसं सांगत...

“फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारल्यासारखं वाटत नाही, त्यांचा चेहरा तसं सांगत नाही”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंंबई : बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

फडणवीस यांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारली आहे असं वाटत नाही. त्यांचा चेहरा तसं सांगत नाही. पण ते नागपुरचे आहेत. एकदा आदेश आला की तो पाळायचा असतो, हे कारण असावे दुसरे कारण नसावे,” असं शरद पवार म्हणाले आहेत.

हे ही वाचा : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच राज ठाकरेंची सूचक पोस्ट, म्हणाले… 

दरम्यान, एक स्थानिक बाब आहे, आत्ताचे मुख्यमंत्री आङेत ते मुळ साताऱ्याचे आहेत. योगायोग असा आहे की राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे साताऱ्याचे होते. मी पण मुळ कोरेगाव तालुक्याचा होतो. बाबसाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण आणि आत्ता ज्यांनी शपध घेतली ते साताऱ्याचे आहेत,” असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मी एकनाथ संभाजी शिंदे ‘ईश्वर साक्ष’ शपथ घेतो की…; 30 वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेनी घेतली शपथ

शिंदेना मुख्यमंत्री करणं हा फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक, की शिवसेना संपवण्याचं षडयंत्र?; राष्ट्रवादीचा सवाल