Home महत्वाच्या बातम्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हा बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दीघे यांच्या शिकवणीचा विजय आहे, असे शिंदे म्हणाले आहेत. तसेच सर्व घटकांना न्याय देण्याचे काम राज्य सरकारकडून केले जाईल, अशी ग्वाहीदेखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

हे ही वाचा : मी एकनाथ संभाजी शिंदे ‘ईश्वर साक्ष’ शपथ घेतो की…; 30 वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेनी घेतली शपथ

हा बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दीघे यांच्या शिवकणीचा विजय आहे. राज्याचा विकास, महाराष्ट्रातील सर्व घटकांना न्याय देण्याचे काम राज्य सरकारकडून केले जाईल. सर्वांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन काम केले जाईल. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत असणार आहेत. राज्याच्या विकासाचा गाडा आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिंदेना मुख्यमंत्री करणं हा फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक, की शिवसेना संपवण्याचं षडयंत्र?; राष्ट्रवादीचा सवाल

उद्धव ठाकरेंना शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण, मात्र शिवसेना पक्षप्रमुख शपथविधीच्या कार्यक्रमाला जाणार का?

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री; शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले…