Home महत्वाच्या बातम्या उद्धव ठाकरेंना शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण, मात्र शिवसेना पक्षप्रमुख शपथविधीच्या कार्यक्रमाला जाणार का?

उद्धव ठाकरेंना शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण, मात्र शिवसेना पक्षप्रमुख शपथविधीच्या कार्यक्रमाला जाणार का?

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राज्यात शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजप यांचं एकत्रित सरकार स्थापन होत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली.

हे ही वाचा : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री; शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले…

आज संध्याकाळी साडे सात वाजता एकनाथ शिंदे एकटे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीच्या कार्यक्रमाचं उद्धव ठाकरे यांनादेखील निमंत्रण देण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मावळते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. पण या कार्यक्रमाला ते हजर राहतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिवसेना आमदारांचा जल्लोष; गोव्याच्या हॉटेलमध्ये फुल सेलिब्रेशन

मोठी बातमी! आजपासून महाराष्ट्रात शिंदे सरकार; आज सायंकाळी 7 वाजता होणार शपथविधी? 

 उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया, म्हणाले…