आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाच्या नवव्या दिवशी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर विरोधी पक्ष नेते दवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईमध्ये बहुमत चाचणीसाठी आमदार जमलेल्या ताज प्रेसिडेन्स हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम यासारख्या घोषणा देत जल्लोष साजरा केला. यावेळी विरोधी पक्ष नेते दवेंद्र फडणवीस यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पेढा भरवल्याची दृष्य समोर आली आहेत.
हे ही वाचा : भाजपाचा घोषणाबाजी करत जल्लोष; देवेंद्र फडणवीसांचा केला जयजयकार
ताज हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत सेलिब्रेशन केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे हॉटेलबाहेर निघाले तेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले, त्यावेळी फडणवीस यांनी हात जोडून, “आम्ही तुम्हाला उद्या सर्वकाही सांगू,” असं उत्तर पत्रकारांना दिलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरेंवर रादीनामा देण्याची वेळ संजय राऊत यांच्यामुळे आली- दीपक केसरकर
महाराष्ट्रानं एक सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर संजय राऊतांचं ट्विट
“मोठी बातमी! अखेर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा”