आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : सांगली जिल्ह्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या म्हैशाळ आत्महत्या प्रकरणी तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
म्हैशाळमधील त्या 9 जणांची आत्महत्या नसून हत्याकांड असल्यांची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे हत्याकांड गुप्तधनासाठी करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे.
हे ही वाचा : महाराष्ट्रात लवकरच भाजप-सेनेचं सरकार येणार; ‘या’ बंडखोर आमदारांचं मोठं विधान
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजात ही आत्महत्या सावकारी कर्ज असल्याच्या कारणातून केल्याचं समोर आलं होतं.
मृत माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे यांच्या खिशात काही सावकारांची नावे असलेली चिठ्ठी सापडल्याने त्याच्यांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र गुप्तधनाच्या लालसेपोटी कुटुंबाने पैसे एक मांत्रिकावर लुटवले होते अशा चर्चा होत्या.
दरम्यान, याप्रकरणी अब्बास महमदअली बागवान वय 48 वर्षे. रा मुस्लिम बाशा पेठ,लेगाव रोड, सरवदेनगर सोलापुर आणि धीरज चंद्रकांत सुरवशे वय 30 वर्षे रा. वसंत विहार ध्यानेश्वरी नगर, प्लॉट नं 59 जुना पुणा नाका, सोलापूर यांना अटक करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
एकनाथ शिंदे गट मनसेत सामील होणार?; आमदार राजू पाटील यांचं मोठं विधान, म्हणाले…
“… म्हणुन उचललेलं हे पाऊल”; एकनाथ शिंदेंनी केला बंडखोरीमागील खुलासा
मोठी बातमी; देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदे यांची वडोदऱ्यात भेट झाल्याची चर्चा