आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांसोबत बंडखोरी केली आहे. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. अशातच ते भाजपसोबत सरकार स्थापन करणार, अशा चर्चा सूरू आहेत. यावरून आता एमआयएमचे खासदार आणि अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली.
मला त्यांच्याबाबतीत काहीही बोलायचं नाही. हा महाविकास आघाडीचा अंतर्गत मुद्दा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आमची मोठी भूमिका असेल. पण या मुद्द्यामध्ये ते पाहून घेतील काय करायचं ते. संजय राऊत शिवसैनिक रस्त्यावर येतील म्हणत असतील तर ते बघतील. महाविकास आघाडी बघेल त्याचं काय करायचं ते. आम्हाला काय करायचंय त्यात. मी त्यात विनाकारण माझा हात का घालू, अशी प्रतिक्रिया ओवेसी यांनी यावेळी दिली.
हे ही वाचा : शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात; संजय राऊत यांचा दावा
आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. सध्या तिथे माकडांचा खेळ सुरू आहे. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारत आहेत. कुणी या झाडावर आहे, कुणी दुसऱ्या झाडावर जात आहे. आम्ही बघतोय हा सगळा तमाशा, असा टोला ओवेसींनी यावेळी लगावला.
महत्त्वाच्या घडामोडी –
“तुम्ही आमचे सहा नगरसेवक फोडले, शिंदेंनी तुमचे 36 आमदार फोडले; मनसेनं शिवसेनेला डिवचलं”
महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…
आमदारांच्या बंडामागे खरंच मुख्यमंत्र्यांचा हात?; स्वत: उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…