Home महाराष्ट्र बंडखोर आमदारांना पुन्हा शिवसेनेत घेणार का?; आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले…

बंडखोर आमदारांना पुन्हा शिवसेनेत घेणार का?; आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास 40 आमदारांसोबत बंडखोरी केली आहे. त्यामुळं महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.

जे आपल्याला सोडून बंड पुकारून गेले आहेत, त्यांना काय मिळणार आहे. जे आज गुवाहाटीमध्ये गेले आहेत तिथे दोन चित्र दिसत आहेत. दोन शूरवीर परत निघून आले आहेत. काही मंडळी केंद्रसरकारला घाबरून गेले आहेत. आता घाण निघून गेली. जे काही व्हायचंय ते चांगलंच होणार, असं आदित्य ठाकरे म्हणाले. ते मुंबईत शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.

हे ही  वाचा : आमदारांच्या बंडामागे खरंच मुख्यमंत्र्यांचा हात?; स्वत: उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

बंडखोर आमदारांपुढे एकच पर्याय आहे. एक तर प्रहार पक्षात जा किंवा भाजपात जा. प्रत्येक ठिकाणी आपले उमेदवार तयार असून ते जिंकायला तयार आहेत. शिवसेनेसोबत लढायचं असेल तर या. तिकडून प्रत्येकाने एकदा राजीनामा पाठवा आणि निवडणूक लढवा. आम्ही तयार आहोत. काही आमदार आपल्याला मेसेज पाठवत आहेत, त्या आमदारांना आपण परत घेऊ शकतो. पण जे दगाबाज आहेत त्यांना महाराष्ट्रात पुन्हा येऊ द्यायचे नाही; ही शपथ घेऊन आपण पुढे चाललं पाहिजे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

“आम्ही शिवसेना सोडून कुठेही जाणार नाही; शिंदे गटातील ‘या’ महिला आमदाराचा व्हिडिओ व्हायरल”

“शरद पवार गोड बोलून काटा काढतात”;शिंदे गटात सामील असणाऱ्या ‘या’ आमदाराचं वक्तव्य

“बंडखोर आमदारांना परत आणण्यासाठी शरद पवार मैदानात, मुख्यमंत्र्यांसोबत दोन तास चर्चा, तर्कवितर्कांना उधाण”