आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी राजकिय बंड पुकारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदेंवर निशाणा साधला.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी घेतलेला निर्णय अँटी डिफेक्शन कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशारा, शरद पवारांनी या पत्रकार परिषदेत दिला. यावरून आता एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हे ही वाचा : मोठी बातमी! भाजपसोबत जाण्याचा शिंदेंचा निर्णय?; व्हिडीओ आला समोर
कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत., असं एकनाथ शिंदे म्हणाले.
12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत., असंही शिंदेंनी यावेळी म्हटलं.
कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे., असा पलटवार एकनाथ शिंदेंनी यावेळी केला.
12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
एकनाथ शिंदेच्या मागे भाजपचा हात आहे, असं वाटतं का?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…
बरं झालं, मुख्यमंत्र्यांची कोरोनाची भिती गेली आणि ते बाहेर पडले; मनसेचा खोचक टोला
भाजपाचे हिंदुत्व सत्तेसाठी कि महाराष्ट्र हितासाठी?; दिपाली सय्यद यांचा सवाल