Home महाराष्ट्र एकनाथ शिंदेंचीच शिवसेना, खरी शिवसेना- रामदास आठवले

एकनाथ शिंदेंचीच शिवसेना, खरी शिवसेना- रामदास आठवले

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सांगली : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी राजकिय बंड पुकारला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. तसेच शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 33 आमदार व 7 अपक्ष आमदार असून या सर्व आमदारांना घेऊन शिंदे सुरतहून गुवाहाटी येथे घेऊन गेले आहेत. या सर्व प्रकरणावर आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांचे महाबंड असून त्यांचाच गट खरी शिवसेना आहे, असं विधान रामदास आठवले यांनी केलं. सामुहिक आत्महत्या झालेल्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी म्हैसाळला भेट दिल्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

हे ही  वाचा : पत्नी रश्मी, मुलांसह उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला, शिवसैनिकांची मोठी गर्दी, शंखनाद, फुलांचा वर्षाव

महाविकास आघाडी अनैसर्गिक होती, बंडाळीमुळे सेनेतील असंतोष बाहेर पडला आहे. महाविकास आघाडीचा विकासाचा अजेंडा नव्हता. त्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीसहून अधिक आमदार बंडामध्ये सहभागी झाले., असं आठवले म्हणाले.

राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे तोंड काळे झाले आहे. सेनेच्या बहुसंख्य आमदारांचे मत भाजपसोबत युती करण्याचे होते. मात्र संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे यांची दिशाभूल केली. यापूर्वी भुजबळ, राणे, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, त्यावेळेपेक्षा आताची स्थिती वेगळी असून हे महाबंड आहे. शिंदे यांचा गटच खरी शिवसेना मानतो. भाजपने आता सरकार स्थापनेसाठी पुढाकार घ्यावा. रिपाईला सत्तेत वाटा मिळायला हवा, असंही आठवलेंनी यावेळी म्हटलं.

महत्त्वाच्या  घडामोडी – 

शिवसेना नेते आणि आमदारांची बंडखोरी हे सर्व भाजपचे षडयंत्र; सुरतहून परतलेल्या नितीन देशमुख यांचा आरोप

…तर मी राजीनामा द्यायला तयार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान

“मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना कोरोनाची लागण, रिलायन्स रूग्णालयात दाखल”