आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याने मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच फेसबूक लाइव्हद्वारे आपली भूमिका मांडली आहे. यानंतर एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारचा फायदा केवळ घटक पक्षांना झाला. यामध्ये शिवसैनिक भरडला गेला. एकीकडे घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत गेलं, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : एकनाथ शिंदेंचीच शिवसेना, खरी शिवसेना- रामदास आठवले
दरम्यान, “पक्ष आणि शिवसैनिक टिकवण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणं अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचं आहे,” असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
३. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
४. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.#HindutvaForever
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
शिवसेना नेते आणि आमदारांची बंडखोरी हे सर्व भाजपचे षडयंत्र; सुरतहून परतलेल्या नितीन देशमुख यांचा आरोप
…तर मी राजीनामा द्यायला तयार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान